Latest Marathi News

BREAKING NEWS

“अजित पवार गटाच्या पाठीशी शरद पवारांचा…”, भाजपा नेत्याचं मोठं विधान

0

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार बंडखोरी करून सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून, दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीपक्षावरच दावा केला आहे. त्याविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अशातच भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा :“…तुम्हाला का वाईट वाटतंय?”, राऊतांच्या टीकेवर अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर

“शरद पवार एनडीएमध्ये आले नाही, तरी अजित पवार गटाच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद आहे,” असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा :अमित शाहांनी अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांनी टीका

शरद पवारांच्या गटाने पक्ष आणि चिन्ह आमचा असल्याचं उत्तर निवडणूक आयोगाला दिलं आहे. याबद्दल विचारल्यावर आशिष देशमुख म्हणाले, “अजित पवार गटाच्या पाठीशी शरद पवारांचा संपूर्ण आशीर्वाद आहे. ते वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण, संपूर्ण अधिवेशनात राष्ट्रावादीच्या आमदारांमध्ये कुठेही दुफळी असल्याचं दिसलं नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.