अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. अजितदादा, तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे अमित शहा यांनी काल (६ ऑगस्ट) पुण्यात सांगितले. यावरून संजय राऊतांनी आज टीकास्र सोडलं होतं. संजय राऊतांच्या या टीकेवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा :अमित शाहांनी अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांनी टीका
“अमित शाहांनी कौतुक केल्यानंतर तुम्हाला का वाईट वाटतंय?” असा सवाल आज अजित पवार यांनी केला. “आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारी माणसे आहोत. राज्याचा विकास करण्यासाठी, परिसराचा कायापालट करण्यासाठी, आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आणि लोकप्रतिनिधीची कामं होण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. देशपातळीवर मला आज नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही,” असंहीअजित पवार म्हणाले.
हेही वाचा :“25 वर्षे मुंबईसाठी तुम्ही काय केलं?”, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
“काही लोक माझ्यावर टीका करतात की मी आधी असं बोलत होतो, आता तसं बोलतोय. पण अनुभवातून माणसाची मतं उमटत असतात. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रेल्वे स्टेशनसाठी 25 हजार कोटींची तरतूद केली. पहिल्या टप्प्यात 126 स्टेशनसाठी एकूण 13 हजार कोटींची तरतूद केली. यापैकी ४४ स्थानक महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येकाला 40 कोटी मिळाले आहेत. 40 कोटींची रक्कम क्षुल्लक नाही, असेही पवार म्हणाले.