Latest Marathi News

BREAKING NEWS

अमित शाहांनी अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांनी टीका

0

अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. अजितदादा, तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे अमित शहा यांनी काल (६ ऑगस्ट) पुण्यात सांगितले. यावरून संजय राऊतांनी आज टीकास्र सोडलं आहे. आज ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा :“25 वर्षे मुंबईसाठी तुम्ही काय केलं?”, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

अमित शाहांनी अजित पवारांचं कौतुक केल्याने हेच कौतुक २०२४ नंतरही कायम ठेवा, असं संजय राऊत म्हणाले. ‘दादा योग्य जागी आहेत असं अमित शाह म्हणाले. हे २०२४ नंतरही बोला. दादा नक्की कुठे आहेत? या राज्याचं आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यानुसार योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्या कोणी ठरवू नयेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली

हेही वाचा :राहुल गांधी पुन्हा खासदार, लोकसभा अध्यक्षांनी घेतला निर्णय

“कालपर्यंत जे भ्रष्टाचारी होते, नॅचरल करप्ट पार्टी होते, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, या सिंचन घोटाळ्याचा नेता अजित पवार असं अमित शाह म्हणाले होते. आज ते योग्य जागी आहेत”, असा उपहासात्मक टोलाही संजय राऊतांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.