मुंबई : राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते असे आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लगावले होते.त्याच पाठोपाठ उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाल्याने राज्यात मध्य प्रदेशसारखा राजकीय भूकंंप होणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपचे २२ आमदार उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह दिल्लीला आले आहेत. हरियाणातील गुरूग्राम रिसॉर्टवर सध्या हे सर्व आमदार वास्तव्यास आहेत. या हाॅटेल बाहेरील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
बऱ्याच दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट एकमेकांवर आगपाखड करत आहेत. यामुळे सत्ताधारी भाजप पक्षातच दोन गट पडल्याचं उघडपणे पहायला मिळत होतं. सचिन पायलट नाराज असून आता भाजपच्या गोटात समर्थकांसह दाखल होणार असल्याचा कयास आता लावला जात आहे.