Latest Marathi News

BREAKING NEWS

माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको तर ही मदत मुख्यमंत्री निधीला करा- सुभाष देसाई

0

मुंंबई : उद्योगमंत्री, संभाजी नगर पालकमंत्री सुभाष देसाई यांचा आज वदवस आहे. मात्र कोरोनाच्या संकटात त्यांनी आपला वाढदिवस न साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच येणाऱ्या हितचिंतकांना समक्ष न भेटता आपल्या शुभेच्छा दूरध्वनीच्या माध्यमातून द्याव्यात असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुद्धा मंत्री देसाई यांना शुभेच्छा दिला आहे. तसेच पुढची अनेक वर्ष आपण महाराष्ट्राची सेवा करो अशी भावना व्यक्त केली आहे. आज देसाई कोणासही व्यक्तिश: भेटणार नसून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणणाऱ्या हितचिंतकांनी ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्यात येणारी रक्कम प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या कार्यालयात जमा करण्यासाठी ९८२०३१३८५५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती प्रबोधन गोरेगाव संस्थेने दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुभाष देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.