Latest Marathi News

BREAKING NEWS

गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांनी बंदूक वापरली नाही कारण..!-शरद पवार

0

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक विषयावर भाष्य केले आहे. आज मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पवारांनी चीन आणि भारताच्या संरक्षण विषयावर भाष्य केले आहे. तसेच भारताने चीन बरोबर केलेल्या कराराची माहिती सुद्धा दिलेली आहे.

शरद पवार म्हणाले, ” १९९3साली मी जेव्हा चीनला गेलो. त्यावेळी तो ड्राफ्ट आम्ही बनवला होता. त्यानंतर पी,व्ही.नगसिंहराव यांनी तिथे जाऊन तो मंजूर करून घेतला. मसुदा काय होता तर तो असा होता की लडाख आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्यात संघर्ष नको. आणि उद्या एखाद-दुसऱ्या प्रश्नावरून आपल्यामध्ये मतभेद झालेच तर त्या ठिकाणी दोन्ही देशांनी बुलेट वापरायची नाही. तुम्ही पाहिलं परवा त्या रस्त्यावरून वाद झाला तेव्हा तिथे बंदूक वापरली गेली नाही. हा त्या कराराच एक भाग होता. ”

परवा जो चीनशी संघर्ष झाला त्यात निश्चित चीनची भूमिका चुकीची होती. गलवानचं जे खोरं आहे. तो लडाख मधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि लडाख देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. लडाख हा भारतासाठी कधीही चिंता करण्यासारखा भाग नव्हता. तिथे जे काही लोक आहेत ते बुद्धांच्या विचारांचे, शांतताप्रिय आणि भारत आणि भारतियांबद्दल आस्था असणारे लोक आहेत, असे उदगार पवारांनी यावेळी काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.