Latest Marathi News

BREAKING NEWS

वाचा कोरोनावर मात केलेल्या महिलेचा अनुभव..!! त्यांच्याच शब्दात.

0

सोलापूर: मी उत्तरा श्रेयस बचुटे रा. राजस्व नगर, विजापुर रोड, सोलापुर. दि. २६-०७-२०२० मागच्या रविवारी माझी कोरोना टेस्ट पॉजिटिव आली, मी १० दिवस सी.एन.एस. हॉस्पिटल, सोलापुर येथे ऐडमिट होते. उपचार पुर्ण करुन, कोरोना वर मात करुन काल पुन्हा घरी परतले. दिवस कठिण होते पण परिवार, रुग्णालय, आप्तेष्ट, मित्र परिवार यांच्या सद्दीछा व शुभ-आशिर्वाद यामुळे ते सुकर झाले.आज माझा कोरोना चा अनुभव मी मदत होइल या भावनेने मांडू इच्छित आहे.

तो दिवस

मी व माझे मिस्टर ‘असिंम्टोमेटीक’ होतो. रविवारी आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेने ‘रेपिड़- एनटीजेन टेस्ट’ कॅम्प भरविला होता, ज्येष्ठ नागरिक म्हणून कर्तव्य तसेच स्थनिक प्रतिनिधी व महानगरपालिका याना प्रतिसाद देऊन माझे सासू व सासरे जाऊन टेस्ट करुन आले, सासूबाईंची टेस्ट पॉजिटिव आली. १० व्या मिनिटाला मी व माझे मिस्टर जाऊन टेस्ट करुन आलो अणि आमचीही टेस्ट पॉजिटिव आली. सुरुवातिपासुनच सर्वतोपरी कळजी घेऊन सुद्धा लागण झाली म्हणून आधी शॉक बसला, सासुबाईंना फक्त धनकुत आल्यासारखे होऊन अशक्त वाटत होते. मला व मिस्टराना काहीच त्रास नव्हता. महानगरपालिका अधिकार्यांनी आम्हाला सिंहगड मधे जाण्यास सांगीतले, पण आमचे मेडिक्लेम पॉलिसी असल्यामूळे आम्ही सी.एन.एस. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याचा निर्णय घेतला. टेस्ट आल्यावर २ तासाच्या आत आम्ही ऍडमिट झालो. लोकडाऊन मुळे आमच्या संपर्कात कोणी आल नव्हत तरी अम्हाला वाटले त्या सर्व लोकांना आम्ही याची कल्पना देऊन टेस्ट करण्यास सांगीतले. सोसायटीच्या ग्रुप वर सुध्हा जाहिर केले जेणेकरुन गैरसमज होऊ नये. दुसऱ्या दिवशीच आमचे संपूर्ण घर गच्ची पासुन ते पुर्ण अंगणाच्या भिंती पर्यंत आतुन अणि बाहेरून प्रायव्हेट कंपनी कडून सॅनिटाईज करुन घेतले जेणेकरुन आजुबाजुच्या ना त्रास न होवो.

हॉस्पिटलचा प्रवास

आम्हा तिघांना एकाच रुम मध्ये ठेवले होते. सुदैवाने ही आमच्या साठी चांगली गोष्ट ठरली. हॉस्पिटलने आतिशय उत्कृष्ट उपचार व सेवा दिली. सर्व डॉक्टर, सिस्टर, ब्रदर , मावशी, मामा यानी आम्हाला एका घराच्या सदस्या प्रमाणे वागवले. आमच्या आंगा खांद्यावर हात फिरवून वेळोवेळी धीर दिला, विश्वास दिला की लवकर बरे होणार. इतके अलगद सांभाळले की आमचे १० दिवस कसे गेले हे समजले नाही. २ महिन्या पासुन आपल्या घरच्यांपासुन लांब राहत असुन सुद्धा संयमाने कोरोना रुग्णाची न घाबरता सेवा करणाऱ्या त्या सर्वाना आमचा सलाम..!! त्यांचे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. या रोगाचा जास्त त्रास आम्हाला झाला नाही कारण अगदी सुरवातीच्या स्टेज ला निदान झाले. रोगाच्या त्रासा पेक्षा मानसिक त्रास यात भरपुर होतो. आजुबाजुला बरे-वाईट प्रसंग घडतात त्यातून संभाळून घेणे गरजेचे. एका दिवशी आमच्या बाजुच्या खोलीतील रुग्नाच्या परिवारा मधील एक रुग्ण दगावला. करमले नाही त्या दिवशी. पण हॉस्पिटल मधल्या सर्व कर्मचारी धीर द्यायचे. आम्ही दोघ तरुण आहोत पण सासूबाईंनी सौ उर्मिला बचुटे सुद्धा १० दिवस धिराने घेत, जिद्दीने या रोगाचा समान केला. ज्या धिराने या सगळ्या गोष्टीना सामोरे गेल्या त्यासाठी त्यांचे खरे कौतुक, त्यामूळे आमचाही प्रवास सुखर झाला. शेवटी १० दिवस संपले आणी आम्ही काल ०४-०८-२०२० रोजी संध्याकाळी घरी कोरोना वर मात करुन सुखरुप परतलो. या १० दिवसात सर्व संपर्कातील लोकानी आम्हाला सकारात्मक उर्जा दिली. सोसायटी मधून सुद्धा डबा देऊ का, लवकर बरे व्हा या साठी भरपुर फोन आले. आम्ही भारावून गेलो.

अनुभव सखोल सादर करण्याचे कारण

1.हा रोग असाध्या तर नाहीच अणि दुर्धर तर नाहीच नाही, फक्त आणी फक्त योग्य वेळेत निदान होणे अणि योग्य उपचार मिळणे गरजेचे.

2. त्यामूळे कोरोना ची चाचणी करायला घाबरु नाका, ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, ताप खोकला, दम अशी लक्षण दिसले तर लगेच टेस्ट करावी. महानगरपालिकेची रॅपिड टेस्ट, अथवा प्राइवेट लैब टेस्ट उपलबध आहेत.

3. या टेस्ट ला सामोरे जाताना, जर नीगेटिव टेस्ट अली तर दैव बलवत्तर म्हणून अपल्या श्रद्धास्थानचे आभार माना अणि जर पॉजिटिव आली तर दैव १० पट बलवत्तर म्हणून आपल्यात उपजतच असणार्या लढवय्या रक्ताची चुणूक दाखवण्याची संधी मिळली म्हणून देवाचे आभार माना. पण याचा सामना मात्र नक्की करा, भिऊन काहीच साध्य होणे नाही.

4. काळ नक्किच सोपा नाही, मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टीना समोरे जावे लागते तेव्हा आपल्याला सकारात्मक उर्जा देणारया गोष्टीं वर लक्ष केंद्रीत करा. पुस्तके, प्रार्थना, गाणी सगळे सोबती करा.

5.मी वैयक्तिक जयसिंग पवार यांचे मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध हे पुस्तक वाचत होते, एक एक घटना स्फुर्ती देणाऱ्या होत्या.

6. बऱ्याच किचकट गोष्टी असतात, प्रक्रिया मोठ्या असतात, या सगळ्यात कोणतीही मदत पाहिजे असेल तर मला बिनदिक्कत फोन करा, मी व माझा संपुर्ण परिवार आपल्याला सर्वोतोपरी मदत करु. अगदी टेस्ट करणाऱ्या असिस्टंटच्या फोन पासुन ते डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लाजमा देणे असेल तरीही.

7.आपल्या आजूबाजूचे कोणते कुटुंब जर या वाईट वेळतून जात असेल तर त्यांना नक्की मदत करा, ऊर्जा दया, हीन वागणूक देऊ नाका. कारण ती वेळ खुप वाईट असते.

आपण कोणावरही अशी वेळ येऊ नये हिच इश्वर चरणी प्रार्थना.
पोस्ट थोडी लांब आहे परंतू नक्की वाचणे.

उत्तरा बरडे- बचुटे

Leave A Reply

Your email address will not be published.