Latest Marathi News

BREAKING NEWS

एका चित्रकाराने कसा रंगवला त्याच्या आयुष्याचा कॅनव्हास..!! जाणून घ्या त्यांचा प्रवास त्यांच्याकडूनच

0

औरंगाबाद : लहानपणी सगळ्यांच्याच आवडता विषय म्हणजे चित्रकला, जमिनीवर रेलून, दोन्ही पाय पोटात घेऊन, जीभ ओठांमध्ये दाबून आपण कित्येक कागदांवर लहानपणी रंग भरलेले असायचे. जितका तिटकारा आपल्याला इतर परीक्षांचा असायचा तितकीच ओढ चित्रकला स्पर्धेची असायची. तासन तास आपण आडव्या कागदाच्या चाकोरीत गुंतून जायचो. पण जशा जशा इयत्ता वाढत गेल्या चित्रकला लांब गेली. पण काही लोक असतात जे आयुष्याच्या कॅनव्हासचे रंग सोडत नाहीत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कृष्णा कुलकुंडवार.

मूळचे कंधार येथे वास्तव्य असलेल्या कुलकुंडवार यांनी १९९१ साली औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयातून अप्लाईड आर्ट विद्यापीठात प्रथम येत पूर्ण केले, यानंतर अनेक पुरस्कार मिळवत, त्यांनी १९९१ ते १९९६ या वर्षात अनेक जाहिरात संस्थांमध्ये काम केले. १९९७ साली सर जी. जे. कला महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. आज २३ वर्ष अविरत ते अध्यापनाचे कार्य करत आहेत.

आपल्या एबस्ट्रॅक्ट आर्ट साठी प्रसिद्ध असणाऱ्या कुलकुंडवार यांच्या पेंटिंग्जना अनेक परदेशी एक्झिबिशन्स
मध्ये स्थान मिळाले आहे. त्यांनी स्वतः देखील अनेक एक्झिबिशन्स भरवले आहेत, नेमके एखादे चित्र जन्म कसे घेते ? ते कॅनव्हास वरती कसे उतरते ? हे सगळं ऐका स्वतः एका चित्रकाराच्याच तोंडातून..!!

Leave A Reply

Your email address will not be published.