लायन्स क्लब बार्शी रॉयल व महाजन नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर रविवार दि:26/11/2023 रोजी महाजन नेत्रालय येथे सकाळी 9ते 1वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे, तरि यासाठी पूर्व मोफत नोंदणी करणे आवश्यक आहे ,या शिबिरात मधुमेहाचे डोळ्यावर काय परिणाम होतात,दक्षता काय घ्यावी याबाबत, जिल्ह्यातील नेत्रारोग तज्ञ यांचे कडून जनजागृती केली जाणार आहे मधुमेहामुळे डोळ्यावर विविध परिणाम होतात सतत रांजणवाडी येणे डोळ्या मगचि नस कमजोर होणे काच बिंदूचे पडद्यावर होणारे बदल स्नायूचे प्यारलिसीस होऊन तिरळेपणा येणे ही लक्षणे असून वेळीच सल्ला घेतल्यावर या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
मधुमेह हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाले की तातडीने डोळ्याची रिटायनॉथेरपी करावी,यामुळे वेळीच निदान झाले की, उपचारातून लवकर आराम मिळतो.असे डॉक्टर नेत्र रोग तज्ज्ञ: श्री मोहन महाजन यांनी सांगितले .यासाठी मोफत तपासणी करण्यात येणार आहे तरी गरजूनी याचा लाभ घ्यावा असे आव्हाहन डॉ.मोहन महाजन व लायन्स क्लब चे प्रोजेक्ट चेअरमन डॉ. निनाद माढेकर (दोशी) , क्लबचे अध्यक्ष ला.राजेश खाडे ,सेक्रेटरी मनीष रुगले,खजिनदार शशिकांत बरबोले यांनी केले.
