Latest Marathi News

BREAKING NEWS

या चुकीच्या सवयींमुळे हाडे होतात कमजोर, अशी घ्या काळजी

0

हाडे शरीरासाठी एक सपोर्ट सिस्टीम असते. हाडांनी शरीराला एक स्ट्रक्चर मिळण्यासोबतच मसल्सनाही सपोर्ट मिळतो. तेच जर तुमची हाडे कमजोर झाली तर याने शरीरात वेदनाही होते आणि इतरही अनेक समस्या होतात. त्यामुळे हाडांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कधी कधी आपल्या चुकांमुळे हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ अशा काही चुकीच्या सवयींबाबत ज्यामुळे हाडे कमजोर होतात.

पुरेशी उन्ह न घेणे

काही लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ घराच्या आताच घालवतात. त्यामुळे त्यांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. हे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडांना योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळत नाही. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. रोज 30 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.

जास्त वेळ बसून राहणं

काही लोक तासंतास बसून राहतात. असं केल्याने तुमच्या हाडांचं नुकसान होतं. कारण हाडे निरोगी ठेवण्यासाठी त्यांची हालचाल होणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्त वेळ एकाच जागेवर बसणं टाळा. रोज थोडावेळ एक्सरसाइज करा.

जास्त मिठाचं सेवन करणं

सोडिअम शरीरासाठी फार महत्वाचं असतं. मिठातून भरपूर प्रमाणात सोडिअम मिलतं. पण याचं जास्त प्रमाणात करणंही महागात पडू शकतं. जास्त मिठामुळे तुमची हाडे कमजोर होतात. म्हणून मिठाचं सेवन कमी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.