बार्शी (सचिन आपसिंगकर)
सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक, शैक्षणिक, व्यापार, कला-साहित्य-संस्कृती, हा वारसा लाभलेले, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा सेतु साधणारे बार्शी शहर आज मेडिकल हब म्हणूनही ओळखले जात आहे. अत्याधुनिक यंत्र सामुग्री, तज्ञ प्रशिक्षित डॉक्टर्स असलेल्या सार्वजनिक संस्थांच्या आणि खाजगी मालकीच्या हॉस्पिटल्समुळे बार्शीमध्ये विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी लगतच्या उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, या जिल्हयातूनही रुग्ण येतात. पुणे-मुंबई सारख्या महानगरांमध्येच होणार्याल दुर्मिळ शस्त्रक्रिया बार्शी शहरातील हॉस्पिटल्समध्ये होतात, असा बार्शीचा नावलौकिक आहे.
आशिया खंडातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे निदान, उपचार व संशोधन केंद्र असलेले स्वर्गीय नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल हे ज्येष्ठ फिजिशियन डॉ.बी.एम.नेने यांच्या व इतर समाजधुरीनांच्या योगदानातून उभारलेले आहे. राज्यातील शिक्षण व आरोग्य सेवाक्षेत्रात बार्शीच्या कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांचे चरित्र अजरामर झाले आहे. मामांनी स्थापन केलेल्या हॉस्पिटलमध्ये आज साडेतीनशे बेडची रुग्णदाखल व्यवस्था असून दररोज शेकडो रुग्ण बाह्यरुग्ण विभागात सेवा घेतात.
नवजात शिशुंच्या उपचारांपासून ते हृदयरोग विभागापर्यंत सर्वच विभाग येथे कार्यान्वित आहेत. यासंस्थेने पस्तीस कोटी पेक्षा अधिक खर्च करून उभारलेले ट्रौमायुनिट हे अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठे वरदान ठरते आहे. राज्यातील सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या बार्शी मॅटरनीटी अँड जनरल को-ऑपरेटीव्ह हॉस्पिटलचे रूपांतर आज हिरेमठ हॉस्पिटलमध्ये झालेले आहे. कॅन्सर हॉस्पिटल व हिरेमठ हॉस्पिटल हे आज माजीमंत्री दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली व डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल हे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.बी.वाय. यादव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.
बार्शीमध्ये ज्येष्ठ फिजिशियन डॉ.गुलाबराव पाटील, व डॉ.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र फिजिशियन डॉ.रोहन पाटील व स्त्रीरोगतज्ञ व शल्यकर्मी डॉ. श्रद्धा पाटील यांचे श्रद्धा हॉस्पिटल हे बार्शी शहरातील मोठे आरोग्य केंद्र आहे. येथे विविध व्याधींवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच कर्करोगावर अत्यंत गुंतागुंतीच्या असाध्य शस्त्रक्रिया करणारे सुविख्यात शल्यकर्मी म्हणून राज्यात ख्याती असलेल्या डॉ.विजयकुमार केसकर यांनी स्थापन केलेल्या विराज इंस्टीट्यूट फॉर मिनिमल अॅक्सेस सर्जरीज अँड रिसर्च सेंटरने बार्शी शहराच्या वैद्यकीय विश्वाची ऊंची वाढवली आहे. बार्शी शहरात कॅन्सर सर्जन डॉ.राहुल मांजरे हे सई संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत आहेत. शहरात सुविधा हॉस्पिटल देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. कुर्डूवाडी रोडवर सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ.प्रकाश बुरगुटे, डॉ.विलास देशमुख, डॉ.बाळासाहेब लोखंडे, हे सेवा देत आहेत. शहरात मेंदू विकारांवर महानगरांमध्ये होणार्यार अवघड शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून भगवंत इंस्टीट्यूटचे संस्थापक व न्यूरोसर्जन डॉ.अमित पडवळ यांची महती वाढलेली आहे. तसेच सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ.संजय अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, डॉ.गणेशकुमार सातपुते यांचे शैलजा हॉस्पिटल, डॉ.लक्ष्मीकांत काबरा यांचे श्रीराम हॉस्पिटल, डॉ.योगेश सोमाणी यांचे सोमाणी हॉस्पिटल, तसेच डॉ.मिलिंद लामकाने, डॉ.विक्रांत शहा, डॉ.विक्रम निमकर, डॉ.अजित पोकळे, डॉ.कैवल्य गायकवाड, डॉ.अजित आवाड, डॉ.अमोल जाधव, डॉ.निनाद माढेकर, डॉ.राहुल बंदसोड हे सेवा देत आहेत.
डॉ.बी.वाय. यादव हे बार्शी शहरातील ज्येष्ठसर्जन असून त्यांच्याकडे वैद्यकीय सेवाभावाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून पहिले जाते. तसेच जनरल सर्जनमध्ये डॉ.जवाहर माढेकर, डॉ.आदित्य साखरे, डॉ.सुधीर बकरे, मूत्रपिंड शल्यकर्म डॉ.पुष्कराज यादव हे योगदान देत आहेत. कान-नाक-घसा व्याधी व उपचार तज्ञ डॉ.तरंग शहा, डॉ.मुकुंद तांबारे, व डॉ.सिद्धेश्वर शिराळ यांची ख्याती आहे. शहरात, राज्यात साहित्यिक म्हणून लाखो वाचकांपर्यंत पोहोचलेले मनसोपचार तज्ञ डॉ.कृष्णा मस्तूद व डॉ.संतोष बिनवडे हे मनोविकार ग्रस्तांना उपचार व समुपदेशनाचे कार्य करतात. बार्शी शहरात वैद्यकीय जगतामध्ये डॉ.मिराताई यादव, डॉ.अपर्णा शहा, डॉ.श्वेतल सोमाणी, डॉ.संगीता पाटील, डॉ.वर्षा मोरे, डॉ.स्नेहल माढेकर, डॉ.मंजूषा कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.धनंजय देशपांडे, डॉ.कुमार जगताप, डॉ.दीपक जगताप, डॉ.देवदत्त मोरे, डॉ.एल.एस.तांबारे हे सेवा देत आहेत.
बालरोग तज्ञ म्हणून डॉ.चंद्रकांत मोरे, डॉ.सुनील पाटील, डॉ.हरिष कुलकर्णी, डॉ.प्रसाद कुलकर्णी, डॉ.जितेंद्र तळेकर, डॉ.आनंद मोरे, डॉ.विजयसिंह भातलवंडे, डॉ.नितिन लाड,डॉ.अबिद पटेल, हे कार्यरत आहेत. दंतरोग तज्ञ म्हणून डॉ.गोपाळ हंबीरे, डॉ.जगदीश मिरजकर, डॉ.अमोल सुराणा, डॉ.प्रमोद जाधवर, डॉ.सागर हाजगुडे हे कार्य करीत आहेत. आयुर्वेदिक तज्ञ डॉ.प्रमोद एडके, डॉ.प्रदीप जाधव, डॉ.विनायक हागरे, डॉ.योगेश कुलकर्णी, डॉ.सुयोग गांधी, डॉ.एन.पी.देशपांडे, डॉ.रविंद्र पवार, होमिओपॅथितज्ञ डॉ.कालिदास लीमकर, डॉ.नंदन गंभीर, डॉ.शीतल कुलकर्णी, तसेच नेत्ररोग तज्ञ डॉ.सचिन करळे, डॉ.मोहन महाजन, डॉ.शरदचंद्र जोशी, सोनोग्राफी व डायग्नोस्टिक तज्ञ डॉ.विवेकानंद जानराव, डॉ.राघवेंद्र अणवेकर, डॉ.आशिष बोपलकर, डॉ.प्रमोद सावंत, डॉ.शीतल लोखंडे, हे कार्यरत आहेत.
बार्शी शहरामध्ये राज्यभरात आपल्या वैद्यकीय सेवा, कार्यकुशलता यामुळे नाव लौकिक प्राप्त डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मोठी संख्या आहे, यासर्व हॉस्पिटल्स आणि डॉक्टर बंधु-भगिनींना डॉक्टर्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा.
(टीप: या लेखामध्ये तांत्रिक व शब्द मर्यादेमुळे काही डॉक्टर्स व संस्थांची नावे अनावधानाने वगळली असू शकतात. त्यांनाही डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा !)