Latest Marathi News

BREAKING NEWS

चंद्रकांतदादा पाटील यांचा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाला दिवाळीपूर्वी दिलासा

0

पुणे |

गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ ही मागणी चंद्रकांत दादाच्या महत्त्वपूर्ण निर्णय यामुळे मार्गी लागलेली आहे. राज्यात तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. आता या प्राध्यापकांना प्रति तास ६२५ रुपये (पदवी) आणि ७५० रुपये (पदव्युत्तर) आणि प्रात्यक्षिकांसाठी प्रति तास २५० रुपये(पदवी) आणि ३०० रुपये (पदव्युत्तर) अशी वाढ करण्यात आली आहे. या मानधन वाढीमुळे राज्यातील जवळपास ३५ हजार सीएचबी प्राध्यापकांची दिवाळी गोड होणार आहे.तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला होता. या सर्व निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशा सक्त सुचनाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे उच्च शिक्षण संचालक व सर्व विभागीय सह संचालकांना महत्त्वपूर्ण सूचना

  • राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील कार्यरत अध्यापकांचे २०२१-२२ पासून प्रलंबित मानधन देणे.

-२१/१०/२२ पूर्वी अध्यापकांना मानधन दिले जावे.

-यासंबंधी संचालकांनी दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा.

  • सदर विषयाबाबत कोणतीही दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.