Latest Marathi News

BREAKING NEWS

चीनवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, उपस्थित केले हे प्रश्न

0

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. देशात संतापाची लाट उसळली. मोदी सरकारने यानंतर ५९ चायनीज अॅप्स वरती बंदी आणली, बऱ्याच लोकांनी याला डिजिटल स्ट्राईकचे देखील नाव दिले. यानंतर लडाखमध्ये जाऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले. परंतू काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यातून चीनी सैनिकांचे मागे हटणे आणि चीनी पक्षाशी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या चर्चेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट करत तीन प्रश्न विचारले आहेत. अजित डोवाल आणि चीनी पक्ष यांच्या दरम्यान जी चर्चा झाली. राहुल गांधी यांनी हे प्रश्न चीनने गलवान खोऱ्यात आपले सैन्य मागे घेण्याबाबत विचारले आहेत. दोन्ही देशांदरम्यान भारताकडून जैसे थे स्थिती कायम ठेवण्याच्या मुद्द्यावर जोर का दिला नाही ? असा प्रश्न राहुल गांधीनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनी स्टेट काउंसिलर वांग यी यांच्या चर्चेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून जारी केलेले निवेदन शेयर केले आहे. राष्ट्रहीत हे सर्वोच्च आहे. त्याचे रक्षण करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले तीन प्रश्न

१. जैसे थे स्थितीबाबत दबाव का टाकण्यात आला नाही?

२. चीन आमच्या भूभागात २० निशस्त्र जवानाच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे?

३. गलवान खोऱ्यातील आमच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाचा उल्लेख का केला गेला नाही?

Leave A Reply

Your email address will not be published.