Latest Marathi News

BREAKING NEWS

खासदार संभाजीराजे यांची आरक्षणाबाबत काय आहे प्रतिक्रिया

0

कोल्हापूर : स्वराज्य निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेतले. 1902 मध्ये राज्यश्री शाहू महाराज यांनी मराठा समाजासह आरक्षण जाहीर केले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. माननीय न्यायालयाचा निकाल यायचा तू येईल, मात्र या निमित्ताने माजी याचिकाकर्ते आणि विरोधक या दोघांनाही अशी विनंती आहे की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. मराठा समाजाचे आरक्षण मान्य करून आपण महाराष्ट्रात शिवशाहू विचारांचा जागर करूया असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी कोल्हापुरात केले.

मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणा बाबत सुप्रीम कोर्टात आज सकाळी सुनावणी झाली. या सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार संभाजीराजे सहभागी झाले. जुना राजवाड्यातील भवानी मंडप येथील कार्यालयातून खासदार संभाजीराजे यांनी यात सहभाग घेतला. सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या सुप्रीम कोर्टातील प्रत्येक सुनावणीसाठी मी दिल्ली येथे हजर राहिलो आहे. कोरोनामुळे आत्ताची सुनावणी वर्च्युअल पद्धतीने झाली. न्यायालयाने आरक्षणा बाबत सविस्तर मते मागवली आहेत लवकरच पुढील सुनावणी होईल. तर येत्या बुधवारी वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत न्यायालय निकाल देण्याची अपेक्षा आहे.

Sambhaji raje bhosle

मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास केला आहे. मराठा समाजासाठी जे काही बारा-तेरा टक्के आरक्षण देण्याचे ठरले आहे ते सर्व घटकांनी मोठ्या मनाने मान्य करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.