Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर एक मीम शेअर करत शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे

0

अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली आणि त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली. विभाजनानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघेही परस्पर आरोप-प्रत्यारोपांमध्ये गुंतल्याने अनेक दिवस तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यानंतर दोन्ही गटातील नेते शांत झाले आहेत. अलीकडच्या काही दिवसांत हे नेते विधानभवनाच्या आवारात हसत, गप्पा मारताना आणि एकमेकांना मिठी मारतानाही पाहायला मिळत आहेत.

पक्षाच्या या स्थितीमुळे दोन्ही गटांच्या भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा :“संभाजी भिडे जर फडणवीसांचे गुरुजी असतील तर…”,भास्कर जाधवांचं थेट वक्तव्य

हेही वाचा :देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत संभाजी भिडेंना गुरुजी संबोधल्याबद्दल उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी (१ ऑगस्ट) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीने या मेळाव्याला आणखी महत्त्व आले. मात्र, या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजकीय घडामोडींनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमातील सहभागावर जाहीर टीका केली आहे.

हेही वाचा :वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रकाश आंबेडकरांनी एक मीम शेअर करत शरद पवारांवर टीका केली आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले, “जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला (शरद पवार) जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर (भाजपा) जायचं असेल, तर खुशाल जावा. पण तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला फसवू नका. शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात.”

या ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेचा मीम शेअर केला आहे. संबंधित मीममधील महिलेनं काही दिवसांपूर्वी सरकारविषयी अपशब्द उच्चारत टीका केली होती. सर्वजण मिळून आम्हाला पागल बनवत आहेत, अशी टीका त्या महिलेनं केली होती. त्यानंतर या महिलेची सोशल मीडियावर ‘गोरमेंट आंटी’ अशी ओळख निर्माण झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.