Latest Marathi News

BREAKING NEWS

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

नाशिक : महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरातील भाषणात भिडे यांनी ही विधाने केली होती. त्यामुळे हा गुन्हा अमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना गुरुजी संबोधल्याने विरोधक आक्रमक

हेही वाचा :बार्शीपुत्र संजय कांबळेंचे AI छायाचित्र प्रदर्शन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट

याबाबत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले मंडळाचे अध्यक्ष संतोष गाडेकर यांनी तक्रार दिली होती. भिडे यांच्याकडून महापुरुषांविषयी वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. ३० जुलै रोजी भिडे यांनी अमरावती येथील व्याख्यानात त्याची पुनरावृत्ती केली. महात्मा फुले यांच्याविषयी अतिशय हीन दर्जाची भाषा वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साईबाबा यांच्याविषयी बोलताना त्यांचा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.