Latest Marathi News

BREAKING NEWS

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत संभाजी भिडेंना गुरुजी संबोधल्याबद्दल उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

0

संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार अशा बाबींवर लक्ष देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे.मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे हे योग्य आहे आणि अयोग्य आहे असं म्हणत संभाजी भिडेंच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. हे विधान पत्रकारांशी मागील संवादादरम्यान करण्यात आले होते. तसेच, ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले की जर देवेंद्र फडणवीस भिडेंना उद्देशून “गुरुजी” ही उपाधी वापरत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

हेही वाचा :वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा :विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना गुरुजी संबोधल्याने विरोधक आक्रमक

आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला आणि राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच अपेक्षा आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.