Latest Marathi News

BREAKING NEWS

जेवण केल्यावर आता फुगणार नाही पोट, करा हा उपाय गॅसची समस्या होईल दूर

0

अनेकांना जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या जाणवते त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सुद्धा त्यांच्या पोटातून जातो तसेच अनेकवेळा तर थोडं खाल्ल्यानंतरही पोट खूप फुगतं. मेडिकल भाषेत याला ब्लोटिंग असं म्हणतात. यालाच पोटात गॅस किंवा हवा भरणे असंही म्हणतात. पोटात सूज किंवा वेदनेसोबत ढेकर किंवा पोटात अस्वस्थता ही ब्लोटिंगची लक्षण आहेत.

असं मानलं जातं की, घाईघाईने जेवणं करणं आणि यावेळी पोटात जास्त हवा जाते. सोबतच जास्त खाणे, बद्धकोष्ठता, लिव्हरचा आजार, गर्भावस्था यामुळे ब्लोटिंगची समस्या होते. त्याशिवाय बीन्स, डाळी, ब्रोकोली, कोबी, जास्त मीठ असलेले पदार्थ आणि दुधामुळेही ही समस्या होऊ शकते. न्यूट्रिशनिस्ट यांच्या यांच्यानुसार, पोटातील सूज रोखण्याचे किंवा कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. ज्यात काही मसाले आणि जडीबुटींचा समावेश आहे. जे पचनाला मदत करतात आणि आतड्यांचं काम चांगलं करून पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.

आलं आणि पुदीन्याचा चहा
आलं अपचन, मळमळ आणि सूज कमी करण्यासोबतच अनेक पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे. आल्यामध्ये कार्मिनेटिव असतं, जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये गॅस कमी करतं. तुम्ही आल्याचा चहा बनवून पिऊ शकता आणि यात पुदीन्याची पानं टाकायला विसरू नका. तुम्ही आलं अशा गोष्टींमध्ये टाकू शकता ज्याने गॅस तयार होतो, जसे की, डाळी, छोले, राजमा इत्यादी.

बडीशेपचं पाणी
जेवण केल्यावर बडीशेप खाल्ल्याने पचन प्रक्रिया चांगली होते. याने पोटातील गॅस आणि सूजही कमी होते. दुसरा उपाय हा आहे की, बडीशेप, थोडं आलं आणि एक चिमुट हींग व चिमुटभर काळं मीठ टाकून चहा करा. तिसरा उपाय आहे की, पाण्यात बडीशेप, जिरं आणि धणे मिक्स करून पाणी गरम करून पिऊ शकता.

ओवा आणि पुदीन्याचं पाणी
एका भांड्यात तुम्ही पाणी, ओवा आणि सैंधव मीठ टाकून पाणी उकडून घ्या. हे पाणी कोमट करून जेवण झाल्यावर प्याल तर पोट फुगणं किंवा गॅसची समस्या होणार नाही. त्याशिवा दिवसभर थोडं थोडं पुदीन्याचं पाणी प्या.

Leave A Reply

Your email address will not be published.