Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल ; तहसील परिसरात तणाव

0

सोलापूर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावच्या सरपंच सफलता प्रभाकर पाटील यांच्या विरोधात सात सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार अमोल कुंभार यांच्याकडे बुधवारी दाखल केला.

गुंजेगाव ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांपैकी सदस्य मीरा साळुंके, अंजना जाधव, पार्वती जाधव, शंकर पवार, किरण आठवले, तुकाराम भडकुंबे, संतोष मोटे या सात जणांनी सरपंच सफलता पाटील यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाचे पत्र आपल्या सह्या करून तहसीलदार कुंभार यांच्याकडे दाखल केले.

तहसीलदार कुंभार यांनी 5 एप्रिल 2023 रोजी दुपारी गुंजेगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष सभा काढली आहे. तहसीलदारांनी या सात सदस्यांसह सरपंच सफलता प्रभाकर पाटील, वर्षा भडकुंबे यांना नोटीस काढण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. हा अविश्वास ठराव दाखल करायला सात सदस्य आल्याचे कळताच सरपंचांच्या दिराने एकाच्या अंगावर दक्षिण तहसील कार्यालयासमोरच गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. त्यामुळे तहसीलदार कुंभार यांनी तातडीने पोलिसांना पाचारण करून बंदोबस्तात या सदस्यांना रवाना केल्याची माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.