बार्शी : आषाढी एकादशी निमित्त ग्रामदैवत श्री भगवंत रथ यात्रेत विविध संस्था, मंडळे भाविक भक्तांसाठी फराळाचे पदार्थ,केळी वाटप करण्यात येतात . त्या पदार्थांच्या प्लेट, द्रोन, प्लास्टिक पिशव्या पाणी बाटल्या टाकून दिल्या जातात. त्यामुळे रथ यात्रेत गलीच्छता दिसून येते.
या गोष्टीचं भान ठेऊन जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक,बार्शी. च्या सदस्यांनी रथाच्या पाठीमागे राहून रथ ज्या-ज्या मार्गावरून जातो तो संपुर्ण परिसर स्वच्छ करून शहराचे पावित्र्य राखले.बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, भैय्या बारंगुळे, यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. तसेच भगवंत देवस्थान च्या वतीने पथकाचा सन्मान करण्यात आला.
या मोहिमेसाठी भगवंत मंदिर चे सरपंच दादासाहेब बुडूख, नाना सुरवसे, मोहन कुलकर्णी, पथकाचे अध्यक्ष उमेश काळे यांनी मार्गदर्शन केले तर पथक प्रमुख हर्षद लोहार, अविनाश बोकेफोडे, प्रविण परदेशी, अप्पासाहेब घबाडे, रिजवाना शेख, गणेश ढगे, अक्षय काजळे, धीरज देशमुख, सुदर्शन मोरे, रोहन लोंढे, शुभम यंदे, अबोली पालके, अतिश पालके, दिनेश यादव, माऊली रामगुडे, तन्वी यादव, प्रणाली शिंदे, श्री रणदिवे, अभिषेक वळेकर, केदार शेटे, जगदिश रणदिवे, समाधान सुर्वे, श्री बरिदे, वैभव बोराडे, रोहित कडवे, ललकार कादे, लक्ष्मण इटकर, पवन देवकर, अथर्व यादव, गणेश केंगार यांनी परिश्रम घेतले.