कोल्हापूर : नथुराम गोडसे याचे ज्या पध्दतीने उदात्तीकरण केले त्याच पद्धतीने उदात्तीकरण गोपीचंद पडळकर यांचं केले जाते क. वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला विरोधी पक्षच जबाबदार असेल. आता शिव्या देण्याची मालिका सुरू झाली. आम्ही देखील अशा शिव्या देवू. आमच्या शिव्यांनी त्यांना झोपाही लागणार नाहीत, असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केला.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी ६० बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असे सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली होती.
यावर मुश्रीफ म्हणाले,
आम्हालाही शिव्या घालता येतात. आता शिव्यांची मालिका सुरू झाली. गोपीचंद पडळकर याच्यामागे बोलवता धनी कोण आहे हे उघड आहे. खा. शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी जे व्यक्तव्य केले, त्याचा मी निषेध करतो. कितीही टोकाचे मतभेद असले तरी असे वक्तव्य करणे योग्य नाही.