एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीतून धडा घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करताना मोठी खेळी केल्याचं उघड झालं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्ह यावर दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेल पाठवला आहे.
हे ही वाचा >>“भाजपासोबत जे जे जातात…”,शरद पवारांचा टोला.
हे ही वाचा >>मी जातो, बघतो आणि येऊन सांगतो म्हणणारे थेट शपथ घेताना दिसले, नेमका पवारांचा टोला कोणाला ?
निवडणूक आयोगाला अजित पवारांकडून ३० जूनला याबाबत ईमेल मिळाला. याचा अर्थ राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारचा भाग होण्याच्या दोन दिवस आधीच अजित पवारांनी या सर्व खेळी केल्या. यात त्यांनी ४० आमदार व खासदारांची प्रतिज्ञापत्रही सादर केली. तसेच आपल्याला पक्षाने एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्याचंही नमूद केलं.