Latest Marathi News

BREAKING NEWS

मी जातो, बघतो आणि येऊन सांगतो म्हणणारे थेट शपथ घेताना दिसले, नेमका पवारांचा टोला कोणाला ?

0

अजित पवारांनी बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधीनंतर आज पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि काका शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका अजितदादांनी केली होती तर दुसरीकडे शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवारांनी अजितदादांबरोबर शपथ घेतलेल्या छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला.

छगन भुजबळ जेलमधून परतल्यानंतर काहींनी विरोध केला तरी त्यांना तिकीट दिलं आणि मंत्रिमंडळात मंत्रिपदही दिलं याची आठवणही शरद पवारांनी यावेळी करुन दिली. मात्र ते जरा बघून आलो सांगून गेले अन् शपथच घेतली, असा किस्साही शरद पवारांनी सांगितलं. अजितदादांबरोबर छगन भुजबळांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीत फुट पडण्याच्या २-३ दिवस आधी त्यांनी (छगन भुजबळ) मला फोन केला होता. पक्षात काय चाललंय अशी विचारणा त्यांनी मला केली. काहीतरी घडत आहे, पण मला माहिती नाही, असं मीही त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी जातो आणि नेमकं काय चाललंय ते बघतो आणि तुम्हाला सांगतो असं सांगून गेले. त्यानंतर ते परत आलेच नाही अन् तिथे जाऊन शपथच घेतली, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यामुळे इथून पुढे बघून येतो असं कुणी सांगितलं तर जरा जपून राहा, असा मिश्किल टोलाही शरद पवार यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.