राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि इतर आठ नेत्यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट तयार झाले. आज या दोन्ही गटाकडून मुंबईत वेगवेगळ्याठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले होते.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
हे ही वाचा >>मी जातो, बघतो आणि येऊन सांगतो म्हणणारे थेट शपथ घेताना दिसले, नेमका पवारांचा टोला कोणाला ?
हे ही वाचा >>आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांची अजित पवारांवर टीका
आपल्या भाषणात बोलतांना शरद पवार म्हणाले, “या देशात जे जे पक्ष भाजपासोबत गेले, त्यांचा इतिहास काढून बघा. अकाली दल भाजपासोबत गेले, पण त्यांचे सरकार चालले नाही. अकाली दलाचीही मोडतोड झाली. तेलंगणातही भाजपाचे सरकार टिकले नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. पण त्यानंतर तिथेही त्यांना भाजपापासून वेगळे व्हावे लागले.” भाजपासोबत गेल्यानंतर काही महिने ठिक चालते, पण त्यानंतर सहकारी पक्षाची तोडफोड करण्याचे कारस्थान सुरु होते.