Latest Marathi News

BREAKING NEWS

एक अनोखी दिवाळी ; मुक्या प्राण्यांना माणुसकीचा फराळ वाटप

0

परांडा |

श्री सचिन सोनारीकर हे तीर्थक्षेत्र सोनारी जि.उस्मानाबाद येथील 2000 हून अधिक माकडांची कायमस्वरूपी खाण्याची व शुद्ध पाण्याची व्यवस्था गेल्या 6-7 वर्षांपासून करत आहेत.

दीपावली या सणाच्या मुहूर्तावर माणुसकीचा फराळ हा विशेष कार्यक्रम ते दरवर्षी राबवतात यामध्ये दिवाळीच्या सर्व दिवसात या मुक्या प्राण्यांना दिवाळीचे पदार्थ वाटप करतात. ह्या वर्षी दिवाळीच्या पहिल्याच दिसशी एकशे अकरा किलो बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.

सोनारी येथील माकडांच्या संवर्धनासाठी दर महिन्याला 100 रूपये ही संकल्पना आपण राबवत आहोत त्यासाठी चालू नोव्हेंबर महिन्याची 100 रुपयांची मदत पाठवावी असे आवहान सचिन श्रीनिवास सोनारीकर यांनी केले आहे.
फोन पे/गुगल पे/पेटीयम 8600244275 नंबरवर मदत पाठवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.