बार्शी |
बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले शिक्षक मोहन महादेव बारबोले यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन व वितरण मोहन बारबोले व सौ. विमल बारबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना ही गेल्या अनेक वर्षापासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरच्या मदतीने अविरत सुरू आहे. दररोज सुमारे २०० निराधार लोकांना दोन वेळेचे अन्न निशुल्क घरपोच केली जाते, बार्शी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील ही सेवा नाम मात्र दरात वितरित होत आहे.
आज २१ नोव्हेंबर रोजी मोहन बारबोले व सौ. विमल बारबोले यांच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेचे पूजन केले गेले. त्यांची दोन्ही मुले उच्च विद्याविभूषित आहेत, मोठा मुलगा बार्शीमध्ये जीवन मोहन बारबोले (एम.एम बी.एस. आर्थे) सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे त्याची सून अमृता ह्या देखील डॉक्टर आहेत. त्याचा एक मनोज बारबोले फॉरेस्ट रेंज ऑफिसर आहे, बारबोले कुटूंबिय सामाजिक कार्यात हि अग्रेसर आहेत.