मुंबई | शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केली. याबाबत खुद्द संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. रविवारी रात्री राहुल गांधी यांच्याशी फोनवरून आपले बोलणे झाले. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर थेट निशाणा साधला.
राजकीय मतभेद असतानाही राहुल गांधी यांनी मैत्रीखातर, प्रेमाखातर व्यस्त असतानाही आपल्याला फोन केला, ही आपल्या देशाची राजकीय संस्कृती आहे. तर दुसरीकडे एकेकाळी आमचे सहकारी असणारे आणि आता इतर पक्षात असणाऱ्या लोकांनी आपली विचारपूस न केल्याची खंतही राऊतांनी बोलून दाखवली.
आज महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्याच पक्षात आमचे मित्र आहेत. कधी ना कधी आम्ही एकत्र काम केले. पण राजकारणात आज ‘मित्र’ मित्र राहिलेला नसताता राहुल गांधी यांचा मला फोन येणं ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. भाजप, मनसे यांच्यात आमचे एकेकाळचे सहकारी आहेत.
पण त्या लोकांना माझी किती चिंता? मी जेलमध्ये गेल्यावर त्यांना तर आनंद झाला. याला राजकारण म्हणत नाही. भाजप आणि मनसेवर निशाणा लगावत असताना संजय राऊत यांनी या दोन्ही पक्षांच्या राजकारणाची तुलना मुघलांच्या राजकारणाशी केली. हे तर मुघलांच्या काळातील राजकारण झाले, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टीका