‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात यंदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळला आहे. शनिवारी आणि रविवारी ‘बिग बॉस’ची चावडी रंगली. घरातून या आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर गेले. शनिवारी यशश्री मसुरकर एलिमनेट झाली. तर रविवारी महेश मांजेकर यांनी थेट ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन आणखी एका स्पर्धकाला घराबाहेर आणलं. तो स्पर्धक म्हणजे किरण माने.
‘बिग बॉस’नं यावेळी स्पर्धकांना धक्का देत एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर केलं आहे. पण यातही मोठा ट्विस्ट आणला आहे. रविवारी किरण माने ‘बिग बॉस’च्या घराच्या मुख्य दरवाजातून घराबाहेर जाताना दिसले असले तरी ते स्पर्धेतून बाद झालेले नाहीत. तशी माहिती महेश मांजरेकर यांनी कालच्या एपिसोडच्या अखेरीस दिली होती.
पण किरण माने अजूनही स्पर्धेत कायम आहेत याची कल्पना घरातील सदस्यांना नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात आणखी रोमांचक गोष्टी घरात पाहायला मिळणार आहेत तसेच क्रिरं माने यांचा जिगरी यार विकास आता किरण माने विरोधात इतर सदस्यांजवळ गरळ ओकताना दिसून येत असून यात किरण मानेंना धक्का बसलेला दिसून येत आहे त्यामुळे येणार आठवडा रोमांचक असणार यात काही शंका नाहीये.