Latest Marathi News

BREAKING NEWS

समृद्धी कम्युनिकेशनचे स्वप्निल मगर दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!

0

बार्शी |

बार्शी शहरातील मोबाईल दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करणारे समृद्धी कम्युनिकेशनचे मालक स्वप्निल मगर व सौ. सुप्रिया स्वप्निल मगर यांच्या हस्ते अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन व वितरण करण्यात आले. शहरातील सामाजिक चळवळीमध्ये ही स्वप्निल मगर यांचा सहभाग असतो.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज दिनांक २३ नोव्हेंबर अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण स्वप्निल मगर व सुप्रिया या दाम्पत्यांने केले.

बार्शी शहरातील भोसले चौकामध्ये गेल्या आठ-दहा वर्षांपासून समृद्धी कम्युनिकेशन या नावाने त्यांचे मोबाईल दुरुस्ती विक्रीचे दुकान आहे. त्यांचा सामाजिक उपक्रमात ही सहभाग असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.