Latest Marathi News

BREAKING NEWS

“दिशा सालियनचा मृत्यू हा.” सीबीआयने केला मोठा खुलासा

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूची संपूर्ण देशभर चर्चा झाली. अनेकांनी या दोघांच्या मृत्यूला बॉलीवूडला जबाबदार धरलं तर काहींनी याच राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला.दिशाच्या मृत्यू प्रकरणी राजकारण चांगलच तापल्याच दिसून आल होत. त्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. आता सीबीआयने याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर काही दिवसातच अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली होती यानंतर या दोन्हही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला होता. शिवाय या दोघांनीही एकमेकांसोबत काम केलं होत. त्यामुळे दोघांच्या आत्महत्येमुळे संशय निर्माण करण्यात आला होता. मात्र सुशांत सिंहने आत्महत्या केल्याचे तपासानंतर समोर आलं होत. तर आता दिशा सालियन हिचा मृत्यू देखील एक अपघात होता असं सीबीआयच्या अहवालात समोर आलंय.

सीबीआयने दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सर्व बाबी तपासून पाहिल्या. चौकशी केलेल्यांच्या साक्षी, फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल,संपूर्ण घटनाक्रम या सगळ्याचा अभ्यास करण्यात आला होता. अखेर सीबीआयने तपासाअंती या दोन्हीही स्वतंत्र घटना होत्या, हे सत्य समोर आणलं.

Leave A Reply

Your email address will not be published.