Latest Marathi News

BREAKING NEWS

‘गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय

0

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कानडी सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. बसवराज बोम्मई यांच्या या विधानामुळे आता महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं. बसवराज बोम्माईंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेलीय. एकीकडं सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडं आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.