✒️ प्रोफेसर डॉ.के. के.पाटील
कार्याध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषद…
खर पाहिलं तर इतक्या उंचीच्या माणसांविषयी लिहिण्या इतपत मोठा नाही, परंतु त्यांचा एक जवळचा स्नेही, त्यांची शिस्त व सहवास, भारदस्त सैनिकाप्रमाणे पर्सनॅलिटी व तेवढाच प्रेमळ स्वभाव यातून आलेला अनुभव व्यतीत करण्यात संकोच करणेही उचित नाही. जगात सृजनतेचा, सुसंस्कृत वृत्तीचा, प्रेम भावनेचा आविष्कार कमी कमी होत आहे. माणसांतील माणूस दिसेनासा झाला आहे. या स्थितीत सुसंस्कृत व संवेदनाक्षम मनाची घालमेल होते. अशाही अवस्थेत सुसंस्कृत मनाची माणसे सतत कार्यप्रवण असतात. डॉ. जफांचा प्रवास इंग्रजीतील पंक्तीप्रमाणे.
Little drops of water, little grains of sand, makes the mighty ocean and the pleasant land; so the little good deeds by him, humble through they be, make him noble and great.
वडील- पोलीस दलात – सर्वसामान्य परिस्थिती आडते वडगाव जि. कोल्हापूर मुळगाव
अर्थशास्त्र विषयातील योगदान –
१९७७-७८ मध्ये अर्थशास्त्र संशोधनाची तोंड ओळख – हे पुस्तक कॉन्टीनेंटल प्रकाशन ने प्रसिध्द केलं. त्याची सध्या अद्यावत आवृत्ती निघाली आहे. मराठी माध्यमात पदवी, पदव्युत्तर वर्गांचे संदर्भग्रंथ, ३० पुस्तकांचे लेखन, इंग्रजी माध्यमातही ३० क्रमीक पुस्तके व ०२ संदर्भग्रंथ, संशोधनात्मक लेख १३०, सामाजिक आर्थिक प्रश्नांशी निगडीत ५४० लोकप्रिय लेख, ३० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (वाङमय आचार्य) पदवीसाठी मार्गदर्शन व २५ विद्यार्थ्यांना तत्वज्ञ न पारंगत या पदवीसाठी मार्गदर्शन. जागतिक स्तरावरील गोखले अर्थशास्त्र संस्थेत युजीसी टिचर फेलो असताना गोखलेच्या इतिहासात दोन वर्षात संशोधन पूर्ण करणारे काही मोजक्या व्यक्तीत एक.
विद्यापीठाच्या पातळीवरील त्यांचे योगदान –
मराठीपेक्षा किंबहुना इंग्रजीवरील अधिक प्रभुत्व – शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख पदी असतांना अर्थशास्त्र विभागाला एक वैभव प्राप्त झाले होते. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना किमान मातृत्व भाषेत लिहिता याव म्हणून क्रमीक व संदर्भ ग्रंथांचे साध्या व सुलभ भाषेत लिखाण – शिवाजी विद्यापीठात संचालक, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ तसेच कुलगुरु पदासाठी शॉर्टलिस्टत सुचीत समावेश या पदांना उंची प्रमाणे न्याय, राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठाच्या अभ्यासमंडळांना काळाच्या गतीप्रमाणे बदलवण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची भूमिका.
- उत्कृष्ट शिक्षक – कोल्हापूर विद्यापीठ
- उत्कृष्ट शिक्षक – महाराष्ट्र शासन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उत्कृष्ट ग्रंथ पारितोषिकाचे तीनवेळा मानकरी.
- राज्यशासनाकडून मराठीतील उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्काराने सन्मानीत,
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय ज्योती आवार्ड,
- ग. प्र. पिंपरकर पारितोषिकाने दोन वेळा सन्मानीत,
- दक्षिण भारत जैन सभा कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार विजेते,
- शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट क्रमिक पुस्तक पारितोषिक,
- डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सन्मानणीय संचालक तथा विद्वत सभेचे सन्मानणीय सदस्य.
शिवाजी विद्यापीठाच्या आर. एन. गोडबोले अध्यासनाचे माजी प्राध्यापक, इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरलचे माजी उपाध्यक्ष. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी कार्याध्यक्ष, विश्वस्त व कार्यकारिणीचे सन्मानणीय सदस्य ही सर्व पदे विभुषीत केलीत. शिवाय शिवाजी विद्यापीठ अध्यापक अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ सल्लागार ही पदेही सन्माने मिळालीत. बी.सी.यु.डी. पदावरील त्यांच्या कालखंडात कधी नव्हे एवढ्या महाविद्यालयांना २ (f) व १२(B) ने युजीसीकडे संलग्नित करण्यासाठी धडाका लावला होता. राज्यातील काही अभिमत विद्यापीठाच्या कुलपतीकडून कुलगुरुपदासाठी सन्मानाने विचारणा करण्यात आली होती. परंतु मला लिहावयाचे आहे असे सांगून वेळ निभावून नेणारे डॉ. ज.फा. पाटील. पुस्तक वेडे डॉ. ज.फा. पाटील वाचनाचा विलक्षण छंद असणारा गृहस्थ, अर्थशास्त्रातील नवीन प्रवाह व त्यातील संदर्भ यांचा संग्रह, नुसता संग्रह नाही त्याचे बारकाव्यानिशी वाचन ही खाशियत.
नवीन विद्यापीठ कायद्यात (२०१६) – यु.जी. सी. त काही दुरुस्त्या करण्यात आल्यानंतर मराठी भाषेत समाजापर्यंत सर्वप्रथम पोहोचविण्याचा प्रयत्न करणारे ज्वलंत प्रश्नावरील पुस्तके वाचणे हे तर त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे.
वृत्तपत्रीय लेखनातून सामाजिक समस्या सुलभतेने मांडल्यात व उपाययोजनाही सूचविल्यात. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना साहित्य व कलेची उत्तम जाण व तितकीच आवड आहे. कोल्हापूर नगरीत साजरे होणारे विविध उपक्रमांच्या आयोजनात सहकार्य व श्रोता म्हणून श्रवण करण्यात त्यांना विशेष रुची आहे. सामाजिक बांधिलकी जपताना कमालीची आस्था व तितकीच उत्सुकता जाणवते.
सर्वसामान्याकडे विशेषतः गरीब विद्यार्थ्यांबाबत कणव असलेला, विद्यार्थ्यांची कुवत ओळखून पुढे सरसावण्यासाठी प्रयत्न करणारे, सुरुवातीला मुल ग्रामीण भागातून कोल्हापूरात आल्यानंतर काही दिवस वस्तीगृह मिळत नाही त्यांच्या स्वतःच्या घरी तात्पुरते का ? होईना गत दोन दशकांपासून वास्तव्य देणारे, तात्काळ मदत करणारे, प्रश्न समजून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात.
सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती, लिखानात कामगार वर्गाचे हित जोपासतांना सतत दीन-दुबळ्यांची हतबलता कमी कशी करता येईल याचे प्रबोधन केले. सामाजिक बांधिलकी जपताना कमालीची आस्था व तितकीच उत्सुकता जाणवते. ज्या परिसरात आपण जन्माला आलो, त्या परिसरातील जनसामान्यांची सेवा, जनसामान्यांचे अर्थशास्त्राशी निगडित व्यवहार आपणास करावयाचे म्हणून बऱ्याचशा मोठ्या संधी देखील
आपण सोडल्यात हीच त्यांची जन्मभूमी परिसराविषयीची भूमिका कोणत्याही अपत्कालीन स्थितीत ते धावून जातात व संबंधितास योग्य प्रकारे साहाय्य करतात. विद्यार्थी केंद्रीत प्राध्यापक डॉ. पाटलांच्या चार दशकाच्या शिक्षकी जीवनाकडे पाहिले असता त्यांनी शिक्षकी पेशातून समाजहिताला व विकासाभिमुख शैक्षणिक नेतृत्वाला
अधिक प्राधान्य दिलेले दिसते. आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर पाहण्याची व त्यांचे सुख पाहण्याची आशाही मोठी आहे. आजच्या जगाच्या स्थितीकडे पाहिले असता – माणसं पद व प्रतिष्ठा मिळाली की, सहानुभूती व पूर्वस्थिती विसरतात. परंतु याही स्थितीत आयुष्यभर विद्यार्थी घडविण्याचा ध्यास सरांनी घेतला.
अनेक माणसे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी असतात, परंतु सरांबद्दल प्रचंड आस्था, प्रेम असणारे हजारो विद्यार्थी, हितचिंतक, राज्याच्या कानाकोपऱ्यात व राज्याबाहेर आहे. हीच सरांची शिदोरी – शासनाच्या प्रचलित नियमानुसार कर्तव्य बजावताना अनेकांचे हितसंबंध दुखावलेले असतात परंतु आपले हित किती झाले यापेक्षा लहानसे अहित झाले म्हणून एखाद्याला वाईट गृहित धरणारेही या जगात आहेत. डॉ. ज.फा. पाटील सर आपण शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही समाजातून आमच्या हृदयातून आजही व पुढेही कार्यरत राहाल. सरांनी अनेक धर्मातील विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य केले. सर सकारात्मक विचार करताना प्रगतीला महत्व देतात – शांत, संयमी तितकेच धीरगंभीर, समोरच्या व्यक्तीस त्यांच्या अडचणीप्रमाणे त्याचे म्हणणे ऐकूण घेणे व वेळ देणे या वृत्ती जाणतात. त्यांच्या ध्येयांचा विचार केला असता माझा विद्यार्थी परिपूर्णपणे घडला पाहिजे.
विद्यार्थ्याने यशाच्या दिशेने मार्गक्रमण करावे; चांगल्या व वाईट बाबी समजून समाजात वावरावे या हेतूने त्यांचा आजपर्यंतचा प्रवास दिसतो. चांगला शिक्षक हाच शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, अभ्यास सातत्याने करणे हे विद्यार्थी आपले प्राथमिक कार्य मानतो, त्याचप्रमाणे
ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेले डॉ. ज.फा. पाटील आजही नियतकालिकात, मासिकात, गाजलेल्या वृत्तपत्रात मराठी व इंग्रजीत सातत्याने लिहितात. सरांच्या बाबतीतील महत्वपूर्ण बाब म्हणजे खास गरजू विद्यार्थी, त्याची तळमळ, तसेच प्रामाणिकपणा ओळखून त्यास मदत करणे. कौटुंबिक जीवन त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातील नैतिकता आणि प्रामाणिकपणाच्या आग्रहाचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम झालेला दिसतो. म्हणूनच त्यांचा मुलगा – अभि, मुलगी राजलक्ष्मी, जावई किरण हे आपआपल्या क्षेत्रात उच्च विद्याविभूषित व तितकेच संस्कारीत आहेत. डॉ. पाटलांच्या नशीब व कर्तृत्वाला त्यांच्या सौभाग्यवती सौ.कमल वहिनींचा त्याग व त्यांच्या सहकार्याची जोड नसती तर उत्तुंग झेप घेणाऱ्या पंखांना हवं तितकं बळ मिळालं नसतं.
आयुष्य एका खेड्यातल्या मुलाने, सर्वसामान्य परिस्थिती असताना कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना परंपरागत चाकोरीला छेद देऊन शैक्षणिक उत्थानाचा प्रवास सातत्याने आठ दशके केलात. त्यांच्या मनातील सर्व महत्वाकांक्षा सफल होवोत. त्यांनी मनात ठरवलेली सर्व इप्सितं गाठली जावोत, त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्यातला मित्र अश्याच विलोभनीयतेनं सर्वांवर प्रेम करत राहो हीच या प्रसंगी मनोकामना!
आज त्यांचा गुणगौरव म्हणजे माणसातील माणूसकीचा, त्यांच्यातील असणाऱ्या सद्गुणांचा गौरव आहे. तो भावी पिढीला प्रेरणादायक ठरेल! राजाराम बापू पाटील,
वसंतदादा पाटील, जयंतराव पाटील, सदाशिवराव मंडलिक त्यांच्याशी घनिष्ट संबंध असताना उभ्या आयुष्यात स्वतःसाठी काडीचीही अपेक्षा केली नाही. जगविख्यात अर्थतज्ञ वि.म. दांडेकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, समाजवादी प्रबोधनीचे शांताराम गरुड यांचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो.