सोलापूर |
मित्र नगर दहिटणे रहिवाशांच्या वतीने जन आक्रोश रस्ता रोको आंदोलन काढण्यात आला. हा आंदोलन मित्र नगर पाणी टाकी जवळून मार्केटयार्ड समोरील सर्विस रोड या ठिकाणी काढण्यात आला. आणि नुकताच झालेला मित्र नगर रोडवर रिक्षा आणि ट्रकच्या झालेल्या अपघाताच्या ठिकाणी थांबून कोरबू आणि मुलांनी परिवारातील मृत्यू झालेल्या तिघांना दोन मिनिटांसाठी मोन करून त्यांना येथील रहिवाशांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे हा आंदोलन मित्र नगर दहिटणे रहिदहिटणे
रहिवाशांच्या वतीने करण्यात आला या आंदोलनात कुठल्याही राजकीय किंवा लोकप्रतिनिधी नव्हता. आणि हा आंदोलनाचा कारण म्हणजे मित्र नगर दहिटणे साठी मार्केट यार्ड समोरून जाण्यासाठी भुयारी किंवा पर्याय रस्ता झालाच पाहिजे. मित्र नगर ते मार्केट यार्ड पर्यंत सर्विस रोड पूर्ण व्हावा. नॅशनल हायवे तर्फे देण्यात येणारी 24 तास ॲम्बुलन्सची सेवा हे मार्केट यार्ड चौकात थांबवावी. जेणेकरून अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी. आणि शहरातील अवैध जळ वाहतूक हे बंद काळात सोडण्यात येतात यावर कारवाई व्हावी. अशा अनेक मागण्यांसाठी हा आंदोलन करण्यात आला होता