बार्शी |
सकाळपासून नागरिकांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज येत आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे.
काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही.” असे स्पष्टीकरण दिले आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.