पुणे |
अल्पावधीच लोकप्रिय झालेल्या डिजिटल पुणे न्यूज या डिजिटल चॅनलकडून आपल्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त “पुण्यश्री गौरव २०२३” या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. डिजिटल पुणे न्यूजकडून यावर्षी प्रथमच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून विविध क्षेत्रामध्ये अतुल्य कामिगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कारांची घोषणा डिजिटल पुणे न्यूजचे मुख्य संपादक श्री. महेश कुगांवकर व कार्यकारी संपादक श्री. अजिंक्य स्वामी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. नऱ्हे येथील डिजिटल पुणे मिडिया सर्व्हिसेसच्या कार्यालयामध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्री गौरव २०२३ पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या पुरस्कर्त्यांची नावे खालील प्रमाणे :

श्री. भाऊराव कऱ्हाडे – मराठी चित्रपट क्षेत्रातील योगदान
श्री. अरुण खोरे – पत्रकारिता क्षेत्रातील योगदान
श्री. अभय महाजन – पोलीस प्रशासन सेवेतील योगदान
श्री. नारायण पाटील – उद्योग व सामाजिक क्षेत्रातील योगदान
डॉ. सतिश कळसकर – वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान
सौ. सुरेखा भगत – महिला उद्योजक क्षेत्रातील योगदान
या पुरस्कारांचा भव्य वितरण सोहळा रविवार दिनांक २५ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वा. डिजिटल पुणे मीडिया सर्व्हिसेसच्या नऱ्हे येथील कार्यालयात पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजा माने तसेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सचे डायरेक्टर मा. सुधाकरराव जाधवर उपस्थित राहणार आहेत. तरी डिजिटल पुणे न्यूजच्या सर्व वाचक, हितचिंतक आणि पुणे तसेच परिसरातील नागरिकांना या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन डिजिटल पुणे न्यूजकडून करण्यात आले आहे.