बार्शी (सचिन अपसिंगकर) –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि स्वराज्य प्रमुख संभाजी महाराज आज संघटनात्मक कामाच्या निमित्ताने बार्शी तालुक्यात येत असून त्यांच्या 15 व 16 जुलै रोजी बार्शी शहर व वैराग येथे होणार्याक सभांना महत्व प्राप्त झाले आहे. 2007 सालापासून राज्याच्या समाजकारण व राजकारणात विशेष सक्रिय झालेल्या संभाजी महाराजांनी कधीही स्वत: कोणत्याही पक्षाच्या चौकटीत व बंधनात अडकवून घेतले नाही. हे त्यांच्या आज पर्यंतच्या वाटचालीचे वैशिष्ट्य आहे. महाराजांनी रायगडाचे शिवचरित्रामधील ऐतिहासिक महत्व लक्षात घेत तेथील रिक्त मेघडंबरीमध्ये शिवमूर्तीची प्रस्थापना केली. व त्यानंतर रायगडावर शिवजयंती व राज्याभिषेक सोहळ्यास अतिशय दिमाखात सुरुवात झाली.
त्यानंतर राज्यातल्या अनेक पुरातन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी चळवळ निर्माण केली. रायगड विकास प्राधिकरणाचेही ते अध्यक्ष झाले. मराठा आरक्षणाच्या घोषणावर त्यांनी राज्यात समाजबांधवांची जागरण केलं व प्रबोधनाच्या भूमिकेतून जवळपास चौर्याचऐंशी संघटनामध्ये विविध प्रश्नांवर एकमत घडविले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेला विराटमोर्चा गाजला. महाराजांनी 2009 साली राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर संभाजी महाराजांना भाजपाने राज्यसभेवर नियुक्त केले. मात्र महाराज समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहिले. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता होणे किंवा नेता होणे नाकारले. खासदारपदाच्या कार्यकाळातच महाराजांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नसल्याची प्रखर टीका केली. महाराज यांनी स्वता:च्या वाटचालीमध्ये समाजहिताच्या भूमिकेसाठी लढताना स्वत:ला कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीत अडकवून घेतले नाही. हे या वरुण सिद्ध झाले. 2022 साली त्यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्व पक्षीयांना अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत आवाहन केले. मात्र भाजपने याबाबत नकारात्मक भूमिका घेतली. राष्ट्रवादीने त्यांना पसंती दिली नाही, तर शिवसेनेने पक्ष प्रवेशाचा आग्रह धरला. अशा चर्चा त्यावेळी माध्यमातून प्रसूत झाल्या. 12 मे 2022 रोजी त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
या पक्षाच्या माध्यमातून महाराज शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, व आरोग्य या क्षेत्रातील विकासाचा पंचसूत्री कार्यक्रम राबवित आहेत. बार्शी तालुक्यात दोन दिवस त्यांचे भरगच्च संघटनात्मक कार्यक्रम असून त्यांच्या या दौर्या त ते वैराग येथील नुकतेच लोकार्पणसाठी खुला झालेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे समजते. आरक्षणाच्या व इतर ज्वलंत प्रश्नावर ते कोणत्या भूमिका मांडणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष आहे.