बार्शी |
बाजार समिती बार्शी येथे बालाजी ट्रेडर्स या नावाने आडत दुकान असणारे नितीन नागनाथ राऊत व त्यांच्या स्नेहा राऊत
या दांपत्याच्या हस्ते २९ मार्च रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. आनंद दुकानाच्या माध्यमातून राऊत यांचा जनसंपर्क दांडगा आहे, विविध सामाजिक कामामध्येही त्यांच्या कुटुंबाचा सक्रिय सहभाग असतो. नितीन राऊत यांचे वडील नागनाथ राऊत आमदार राजेंद्र राऊत गटाचे नेते म्हणून ओळखले जातात.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण नितीन राऊत व स्नेहा या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते. मातृभूमी प्रतिष्ठान चा वेगळा पॅटर्न म्हणून महाराष्ट्र लोकप्रिय होऊ लागला आहे.