मुंबई |
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
राज्यातील निवडणुकीसाठी मतदान एकाच दिवशी होणार आहे. दहा मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या २०१८ च्या तुलनेत ९.१७ लाखांनी वाढलीय. १ एप्रिल रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.