बार्शी |
भारतीय कम्युनिस्ट पक्ष बार्शी तालुका कौन्सीलच्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शहिदांचे विचार, श्रमिक वर्गाचे राजकारण व महागाई या विषयावर अभ्यास करून घेण्यात आला.
यावेळी कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे म्हणाले “कष्टकरी वर्गाला स्वतःचे राजकारण लढ्याच्या मैदानात उतरून पुढे न्यावे लागेल , पैसेवाल्या वर्गाचे राजकारण पैसेवाल्यांचे भले करतो, जात- धर्म , वर्चस्व , गुंडगिरी , पैसा यांच्या मदतीने श्रमिक वर्गाचे शोषण केले जाते व भांडवली राजकारण पुढे नेले जाते, आजही देशात सत्तर टक्के लोक उपाशी आणि उघडे आहेत, शहिदांना हे कधीच अपेक्षित नव्हते त्यामुळे शहिदांच्या क्रांतिकारी विचारांनी संघर्ष करावाच लागेल”.
कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद महागाई या विषयावरती बोलताना म्हणाले “अप्रत्यक्ष कर प्रणाली व्दारे श्रमिकांचे शोषण होते, बँका भांडवलदारांना कर्ज पुरवठा करतात ते कर्ज बुडवले जाते , जास्त पैसा असणाऱ्यांना जास्त प्रत्यक्ष कर लावला पाहिजे, रेशन व्यवस्था सरकार मोडते त्यामुळे महागाई वाढते, पेट्रोल – डिझेल स्वयंपाकाचा गॅस याला सरकारने अनुदान न दिल्याने महागाईचा भडका वाढत राहतो, भांडवलदार कर बुडवतात, चलण फुगवटा सरकार करते या सर्वातून महागाई वाढते , या विरोधात श्रमिकांनी सरकार विरोधात संघर्षा शिवाय पर्याय नाही “.
यावेळी कॉ.अनिरुद्ध नखाते यांनी प्रास्ताविक केले, ए बी कुलकर्णी , लहू आगलावे, भारत भोसले, आनंद गुरव , शहापरी शेख, बालाजी शितोळे, धनाजी पवार , भीमा मस्के, शिवकन्या भोसले, निर्मला सरवदे, चांदणी परदेशी आदी उपस्थित होते.