Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्याच्या विकासातील मुक्ताताई टिळक यांचं योगदान कायम लक्षात राहील : अजित पवार

0

नागपूर |

“पुण्याच्या माजी महापौर, कसबा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. १९९२ पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण होती.

पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक जीवनाशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. आमदार म्हणून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.