मुंबई |
डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा प.महाराष्ट्र दौरा सुरु झाला.सकाळी मुंबईहू निघून खोपोलीत बंधू वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या कडे अल्पोपहार झाला. पुढे पुण्याहून कोल्हापूरकडे निघालो. सातारा येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांची धावती भेट झाली.
दोनच दिवसांपूर्वी त्यांचे “साताऱ्याचे शिलेदार” हे पुस्तक प्रकाशित झाले.या भेटीत त्यांनी राजा माने व पत्नी सौ.मंदास पुस्तक भेट दिले. या पुस्तकाच्या लेखन प्रवासावर आमच्या गप्पा झाल्या.९ तारखे पर्यंत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गाठीभेटी आणि काही कार्यक्रम असा दिनक्रम राहील.
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र.