Latest Marathi News

BREAKING NEWS

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला आणखी एक धक्का १४ वर्षांनीं या कलाकाराने सोडली मालिका

0

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मागील 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाशी प्रेक्षकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी आत्तापर्यंत भरभरुन प्रेम केले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडू लागले आहेत. त्यामुळे कुठेतरी या मालिकेची प्रसिद्धता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या मालिकेशीसंबंधीत आणखी एक व्यक्तीने मालिका सोडली आहे. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदाने ही मालिका सोडली आहे. मागील 14 वर्षांपासून ते या मालिकेचे दिग्दर्शन करत होते. 15 डिसेंबरपर्यंत त्यांनी मालितकेचे दिग्दर्शन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद होते. त्यामुळेच त्याने ही मालिका सोडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदाने ही मालिका सोडली आहे. मागील 14 वर्षांपासून ते या मालिकेचे दिग्दर्शन करत होते. 15 डिसेंबरपर्यंत त्यांनी मालितकेचे दिग्दर्शन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद होते. त्यामुळेच त्याने ही मालिका सोडली आहे. मात्र, जेव्हा याबाबत मालव यांना प्रश्न विचारण्यात आला त्याने ही माहिती फेटाळली.

Leave A Reply

Your email address will not be published.