बार्शी |
बार्शी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर कालावधी १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२२-२३ “युवकांचा ध्यास,ग्राम-शहर विकास” दिनांक ३ जानेवारी रोजी उपळाई ठोंगे येथे सक्षम दिवस बालविवाह प्रतिबंध उपक्रम याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक बार्शीचे महारुद्र परजणे हे मार्गदर्शन साठी उपस्थित होते.
हा कार्यक्रम हा जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये सर्व एन.एस.एस स्वयंसेवक, स्वयंसेविका, तेथील शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. स्वयंसेविका प्रतिज्ञा भदेकर यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय रूपाली जाधव यांनी दिला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक वृंद यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी विद्यार्थ्यांना व सर्व एन एस एस स्वयंसेवक व स्वयंसेवकांना उद्देशून मार्गदर्शन केले.यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजळणी दिली. विशेष म्हणजे एन.एस.एस. स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित एक छोटीशी नाटिका सादर केली. त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक सरांनी सरांनी देखील सर्वांना मार्गदर्शन केले.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा विना कदम यांनी अध्यक्षीय समारोप केला. तसेच सर्वांचे आभार देवयानी शेळके यांनी मांडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी माने व ज्ञानेश्वरी पाटील यांनी केले. अशाप्रकारे विशेष श्रमसंस्कार शिबिर मधील सक्षम दिवस बालविवाह प्रतिबंध उपक्रम हा यशस्वीरित्या पार पडला.