बार्शी |
बार्शी शहरातील सुप्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक प्रवीण जाधव व त्यांच्या पत्नी सौ. विद्या यांच्या हस्ते आजच्या अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. जाधव यांचा सामाजिक कार्यातही वाटा असतो, बार्शी शहरांमध्ये ‘जाधव हार्डवेअर अँड मशिनरी’ या माध्यमातून प्रवीण जाधव व त्यांचे कुटुंबीय काम करतात, त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक कामाची आवड ही आहे. आज नऊ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन व वितरण जाधव दांपत्याच्या हस्ते करण्यात आले.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. निस्वार्थ व दातृत्वाच्या भावनेने ही योजना शहरात अनेक वर्षापासून गोरी गरिबांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.