दिग्दर्शक केदार शिंदे कायमच आपल्या चित्रपटांनी लोकांना थक्क करत असतात. ते प्रत्येक चित्रपटात वेगळ्या धाटणीचा विषय घेऊय येत असतात. त्यामुळे त्यांचे चित्रपटांचा एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. केदार शिंदे सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. वैयतक्तिक आयुष्य आणि कामाच्या अपडेट ते सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी शेअर करत असतात.
अशातच केदार शिंदेविषयी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक केदार शिंदेचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट शेअल लिहिलं, ‘नमस्कार, काल रात्री माझं फेसबुक अकांऊंट हॅक झालं आहे. यामध्ये पर्सनल आणि पेज दोन्हीही हॅक झालंय. त्यामुळे त्या अकाउंटवर माझा काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे या दोन्ही अकाउंटद्वारे तुमच्याशी कोणताही संपर्क किंवा संवाद साधला जात असेल तर सावधान. कुठल्याही प्रकारचे रिप्लाय अथवा मेसेज करु नका’.
केदार शिंदे यांनी सगळ्यांनी सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत. केदार शिंदेशिवाय यापूर्वीही अनेक कलाकारांसोबत असा प्रकार घडला आहे. अनेक कलाकारंचेही फेसबुक अकाउंट हॉक झाले आहेत. त्यांनीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सतर्कता बाळगण्यास सांगितली आहे.