Latest Marathi News

BREAKING NEWS

शिल्लक सेनेतील सगळे मर्द संपले असतील, तर…; मनसेचा राऊतांना खोचक टोला

0

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.” असा आरोप केला आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊतांना ट्विटरद्वारे टोला मारला आहे. “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील; तर संजय राऊतांना महाराष्ट्र सैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील.” असे ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सौ दाऊद ज्यांना घाबरतात, त्यांना धमकी आल्याचे कळते. काळजी नका करू. सरकार संरक्षण देईलच. पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील; तर संजय राऊतांना महाराष्ट्र सैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील.

मात्र, चर्चेत राहण्यासाठी अशा काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली आहे का? हे सरकारने पाहावे.” अशी मागणीही त्यांनी केली आहे.संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केले. यावेळी त्यांनी कन्नड वेदिका संघटनेने हल्ला करण्याची धमकी दिल्याचे सांगितले. “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा हल्ला माझ्यावर नसून संपूर्ण महाराष्ट्रावर असेल.” असे ते म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.