Latest Marathi News

BREAKING NEWS

“कर्तव्यदक्ष अधिकारी प्रसाद तारकुंडे दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन..!”

0

बार्शी |

शिवशक्ती बँकेमधील कर्तव्यदक्ष अधिकारी प्रसाद प्रभाकर तारकुंडे त्यांच्या पत्नी सौ.सुरेखा प्रसाद तारकुंडे यांच्या हस्ते
आजच्या अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात, आठ डिसेंबर रोजी तारकुंडे दाम्पत्याच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण करण्यात आले. उभयतांना सामाजिक कामाची आवड देखील आहे.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. ही योजना गरजू व निराधारंसाठी निरपेक्ष भावनेने चालवली जाते, या योजनेचे सर्व स्तरातून कौतुकही होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.