Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेसला चिंतनाची गरज मात्र येत्या काळात ही परिस्थिती बदलेल

0

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे.या दोन्ही राज्यात सत्तेची सुत्र कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. त्यामुळं या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचून आणणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील 37 केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या दोन्ही राज्यात कोण सत्तेत येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.