Latest Marathi News

BREAKING NEWS

३० तारखेला प्रतिज्ञापत्रासह सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे-प्रफुल्ल पटेल

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्हीच दावा सांगितला आहे. ३० जूनलाच आम्ही निवडणूक आयोगात आम्ही याचिका दाखल केला आहे. आमच्या याचिकेचा निपटारा होईपर्यंत कुणीही आमच्यावर कारवाई करु शकत नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. आम्ही अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून नेमलं आहे आणि त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >>पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी घेतला सर्व विभागाशी संबंधित प्रश्नांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरायला सांगत, सुप्रियाताईंनी दिले अजितदादांना आव्हान !कार्यवाहीचा आढावा

हे ही वाचा >>मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल

आमचे निर्णय अधिकृत आहेत. शरद पवार गटाचे निर्णय अधिकृत नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.महाराष्ट्रात नऊ आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्याला काही अर्थ नाही. राजकीय पक्ष कोण? हे निवडणूक आयोग ठरवू शकतो. आमच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या कारवाईला काहीही अर्थ नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तसंच मूळ राष्ट्रवादी पक्ष आम्हीच आहोत कारण आमच्याकडे आमदारांचं जास्त बळ आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. ३० तारखेला प्रतिज्ञापत्रासह सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. निवडणूक आयोग आता त्यावर निर्णय घेणार आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.