Latest Marathi News

BREAKING NEWS

वजन कमी करायचं असेल तर पाणी पिण्याची ‘ही’ खास पद्धत वापरा

0

जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. १२०० लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये भरपूर पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये ३ महिन्यात ४४ टक्के वजन कमी आढळलं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. चला जाणून घेऊ पाण्याने वजन कमी कसं होतं.

पाण्याने वजन कमी कसं होतं?

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते. सोबतच याने शरीरात चरबी जमा होत नाही. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणं महत्वाचं ठरतं. जर तुम्ही पाणी कमी प्याल तर पचनासंबंधी समस्या होतात आणि आरोग्यही बिघडतं. पाणी दोनप्रकारे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतं.

त्याचप्रमाणे पाणी शरीराला बर्न करणारी ऊर्जा किंवा कॅलरीचं प्रमाण वाढवतं. दुसरं म्हणजे पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. पाणी कमी प्यायल्याने फॅट बर्न करण्याची क्षमता कमी होते.

जेवणाआधी प्यावं पाणी

जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जेवण हवं तेवढंच कराल, ओव्हरइटिंग करणार नाही. यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, रोज दोन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावं. पण रिसर्चनुसार, काही लोकांसाठी हे पाणी पिण्याचं प्रमाण ५ लिटर असू शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.